हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : पुण्यातील बाजार समितीत शेतमालाची विक्री करुन घराकडे निघालेल्या सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांना पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत दरम्यान रस्त्यात मारहान करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज लुटणारी टोळी मागिल कांही दिवसापासुन सक्रीय झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कवडीपाट ते उरुळी कांचन या दरम्यानच्या चौदा किलोमिटरच्या टप्प्यात दुचाकीवरन आलेल्या कांही तरुणांनी मागिल पंधरा दिवसाच्या कालावधीत सहा ते सात शेतकऱ्यांना विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना मारहान करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज जबरदस्तीने काढुन नेल्याची चर्चा आहे.
उरुळी कांचन हद्दीत पुणे-सोलापूर रोडवर शुक्रवारी (ता. ०७) दुपारी भर दिवसा दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यातील उजनी परीसरातील दोन शेतकऱ्यांना मारहान करुन, त्यांच्या जवळील रोख रक्कम व टेपोमधील किंमती ऐवज लुटल्याचा धक्कादायक पुढे आला आहे. दुचाकीवरुन येऊन शेतकऱ्यांना मारहान करुन लुटणाऱ्या, दोघांचे सिसीटिव्ही फुटेज शेतकऱ्यांनी पुणे प्राईम न्यूजकडे पाठवले असुन, या फुटेजच्या आधारे लुटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी उजनी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
उजनी परीसरातील शेतकऱ्यांनी पुणे प्राईम न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार, मागिल पंधऱा दिवसापासुन दुचाकीवरुन फिरणारी व शेतकऱ्यांना मारहान करुन लुटणारी सहा ते सात जणांची टोळी पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत दरम्यान सक्रीय झाली आहे. केळी व इतर शेतीमालाची विक्री करुन टेंपोमधुन सोलापुरकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या पाळतीवर वरील टोळी असते. शेतकरी बसलेला टेंपो कवडीपाटहुन यवतकडे निघाला की, वरील टोळीतील सदस्य आपली मोटारसायकल शेतकरी प्रवास करीत असेलेल्या टेंपोजवळ आनुण, मुद्दाम टेपोला धडकल्याचे नाटक करतात. व टेंपो थांबवुन टेंपोाचालक व टेंपोमधील शेतकऱ्यांना शिवीगाळ सुरु करतात. याच दरम्यान मागुन मोटार सायकल वरुन आलेले टोळीतील इतर सदस्य शेतकऱी व टेंपो चालकांचे मोबाईल काढुन घेऊन, त्यांना मारहान सुरु करतात. मोटारसायकलचे नुकसान झाल्याचे कारण पुढे करत, शेतकऱ्यांच्याकडुन दहा ते वीस हजाराची रक्कम वसुली करण्याबरोबरच, शेतकऱ्यांकडील किंमती ऐवजही घेऊन लुटुन नेतात.
मागिल पंधरा दिवसाच्या काळात केवळ कवडीपाट ते यवत दरम्यान वरील टोळीने माढा तालुक्यातील उजनी परीसरातील सहा ते सात शेतकऱ्यांना रस्त्यात मारहान करुन, लाखो रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती लोणी काळभोर पोलिसांनाही मिळालेली आहे. माढा तालुक्यातील उजनी परीसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी पुण्यनगरीचे लोणी काळभोर येथील पत्रकार विजय काळभोर यांच्या माध्यमातुन भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्याशी संपर्क साधल्याने वरील गंभीर बाब पुढे आली आहे. वरील टोळीने यवत हद्दीत अशाच प्रकारे मागिल कांही दिवसापासुन गुन्हे करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, शेतमालाची विक्री करुन घराकडे निघालेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना मारहान करुन लुटणे ही बाब गंभीर असुन, पोलिसांनी तात्काळ हालचाली करुन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी लोणी काळभोर पोलिस व यवत पोलिसांच्याकडे केली आहे. याबाबतचे लेखी पत्र सोमवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व जिल्हा (ग्रामिन) पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांना दिले जाणार असुन, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळाची बंदोबस्त करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहितीही जनार्दन दांडगे यांनी दिली आहे.