Supe News : पुणे: सुपे गावातून सुमारे पावणे चार लाखांचा 15 किलो 450 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (ता.25) अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. ( Ganja worth three lakh seventy five thousand seized from Supe village; three arrested)
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
विकास रोहीदास बदाले (वय 27 तळेगाव एमाआयडीसी), शिवाजी वसंत भोसले (वय 36 करंजविहीरे), लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय 37 अंबोली) यांना अटक केली असून विशाखापट्टणम येथील एक इसम पूर्ण पत्ता व नाव माहिती नाही. याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Supe News)
पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे यांनी याबाबत फिर्य़ाद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली की तीन इसम हे गावातील मुक्ताई मंदिरा समोर गांजा विक्रीसाठी येणार आहेत. (Supe News) त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ही ताब्यात घेतले.
यावेळी विकास व शिवाजी यांच्या ताब्यात 2 लाख 52 हजार 150 रुपयांचा 10 किलो 86 ग्रॅम वजनाचा गांजा तर लक्ष्मण याच्याकडून 1 लाख 34 हजार रुपयांचा 5 किलो 364 ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण 3 लाख 86 हजार 250 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. (Supe News)
लक्ष्मण याने त्याच्याजवळील गांजा हा विकास व शिवाजी यांच्याकडून विकत घेतला होता .तर विकास व शिवाजी याने विशाखापट्टणम येथील चौथ्या साथीदाराक़डून विकत घेतल्याचे कबूल केले. (Supe News) पोलिसांनी तिनही आरोपींकडून एकूण 4 लाख 1 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींवर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : चतुर्थ श्रेणी पदासाठी योग्य सन्मान मिळवून दिला ; प्राचार्य उत्तमराव आवारी यांचे मत