Suicide | उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
विजयकुमार नंदकुमार जमादार (वय- ३५, रा. बगाडेमळा दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका लिंबाच्या झाडाला एक व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती.
सदर माहिती मिळताच पोलीस हवालदार, रमेश गायकवाड, राजेश दराडे, व राहुल माळगे सदर ठिकाणी गेले. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता लिंबाच्या झाडाला एका दोरीने एकाने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
घरात किरकोळ कारणावरून वाद…
त्या व्यक्तीची पोलिसांनी इतर ठिकाणी चौकशी केली असता त्याचे नाव विजयकुमार जमादार असे असल्याचे समजले. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. व घरात किरकोळ कारणावरून वाद होत होते. अशा कारणावरून आत्महत्या केल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, विजयकुमार जमादार यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आत्महत्या का केली याचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Suicide | धक्कादायक! पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या; हडपसर मधील घटना
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट
Suicide | प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून परिचारिकेची आत्महत्या ; लोहगाव परिसरातील घटना..