Solapur News : (सोलापूर) पती-पत्नीच्या वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. स्वतःही विहिरीत उडी मारून पत्नीला बुडविले आणि त्यानंतर स्वतः बुडाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे हि घटना घडली आहे.(Solapur News)
वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले.
सिद्धाराम सुभाष कारंडे (वय-२८) आणि सोनाली सिद्धाराम कारंडे (वय २५, रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) असे मृत्यूमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण बाबू आलदर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Solapur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आलदर त्यांच्या घराशेजारी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा सिद्धाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली आणि त्याची आजीसह राहत होता. सिद्धाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते. १३ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोनाली कारंडे ही त्यांच्या शेतात गेलेली दिसली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिद्धाराम हाही गेला.(Solapur News)
त्यावेळेस सिद्धराम कारंडे हा दारू पिऊन फुल्ल नशेत होता. पती – पत्नीमध्ये वाद चालू होता. यावेळी लक्ष्मण आलदर हे देखील त्यांच्या पाठीमागे गेले. सिद्धाराम हा सोनाली हिला शेतातील विहिरी जवळच मारहाण करत होता. यावेळी पती-पत्नीचा वाद टोकाला गेले. सिद्धाराम याने त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले.(Solapur News)
दरम्यान, लक्ष्मण आलदर हा पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सोनाली या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली आणि आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले. आणि तो स्वतःही बुडाला. या घटनेने सांगोला तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.