Solapur Crime मोहोळ (सोलापूर): शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. ज्ञानाचे धडे देणाऱ्या एका आदर्श शिक्षकानेच त्याच्या सातवीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील एका वस्ती शाळेत घडली आहे. या घटनेमुळे मोहोळमधील धक्कादायक घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे.
या बाबात रविवारी पीडित मुलीच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आरोपी शिक्षकाने पिडीत विद्यार्थिनीला “माझ्याकडे तुझे प्रूफ आहेत”, असं म्हणून ब्लॅकमेल केले. त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यात कधी सकाळी वर्गात लवकर आल्यानंतर, तर कधी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आठवीच्या वर्गात बोलावून पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करत होता.
दरम्यान, शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची ही घटना १५ एप्रिल रोजी उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या पालकांनी विश्वासात घेऊन माहिती घेऊन तिला धीर दिला. फिर्यादीनुसार त्या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!