नवी दिल्ली : वसईच्या श्रद्धा वालकरचा ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियकराने खून केला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तब्बल ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे देशात खळबळ एकच उडाली आहे.
श्रद्धा वालकर (वय-२७) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा प्रियकर आफताब पुनावाला (वय -२८) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर आणि आरोपी आफताब पुनावाला या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय विवाहास श्रद्धाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही दिल्लीला गेले आणि एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला होते.
त्यानंतर लग्न करण्यासाठी श्रद्धाने आफताबकडे तगादा लावला. त्यांच्यात वाद होऊन आफताबने श्रद्धाचा १८ मे ला खून केला. आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तब्बल ३५ तुकडे करुन फ्रिजरमध्ये ठेवले. ते तुकडे एक एक करुन त्याने महारौलीच्या जंगलात नेऊन पुरले.
आफताब बेपत्ता असल्याची तक्रार वसई पोलिसांत १२ ऑक्टोबर रोजी दाखल झाली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. दिल्ली पोलिसांना आफताबला अटक करुन बोलते केल्यावर त्याने अनेक खुलासे केले.
यावेळी आफताबने ‘डेक्सटर’ ही वेब सीरिज पाहून खुनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती दिली. अमेरिकन वेब सीरिजमुळे दिल्लीतील हत्याकांडांचा कट रचला गेला ही ‘डेक्सटर’ वेबसारीज काय आहे, याची आता सर्वांना उत्सुक्ता आहे.
डेक्सटर’ ही एक अमेरिकन क्राइम वेब सीरिज आहे. यातील नायक आपल्या लहानपणी आईची निर्घुण हत्या डोळ्यांनी पाहतो. त्याची ही कथा आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी अनाथ झालेल्या या डेक्सटरला हॅरी मॉर्गन नावाचा पोलीस अधिकारी दत्तक घेतो.
डेक्सटरच्या मनावर आईच्या हत्येचा खूप घातक परिणाम झालेला असतो. त्यातून तो खुनशी झालेला असतो. त्याच्यात दया आणि ममता यांचा अभाव असतो. तो जगाकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहत असतो.
दुसरीकडे डेक्सटर हा खूप हुशार आणि चालाख दाखविला गेला आहे. हॅरी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या आरोपींची डेक्सटर कडून हत्या करून घेतो.
त्यानंतर आपल्यावर कुणालाही संशय येणार नाही, या हेतूने ‘डेक्स्टर’ एका पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक स्पेशालिस्टची नोकरी करू लागतो. डेक्सटर आरोपींची हत्या करताना कोणताही पुरावा सापडणार नाही, याची काळजी घेतो.
ज्या ठिकाणी आरोपींची हत्या करणार आहे, त्या संपूर्ण खोलीमध्ये प्लास्टिक अंथरुन अत्यंत हुशारीने ‘डेक्सटर’ त्यांचा खून करतो. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून अॅटलांटिक महासागरात फेकून त्यांची विल्हेवाट लावतो. अशा प्रकारची चित्तथरारक ही वेब सीरीज आहे.