योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील सुनील विठ्ठल हिंगे (वय ३१, रा. अवसरी, ता. आंबेगाव) यांसह दोघांना नार्कोटिक्सने ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतले आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी शेड व जागा भाड्याने देऊन ती पोलिसांपासून लपविल्याने जागामालक बाळासाहेब मिडगुले यांच्यावर कारवाई करत, गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
शेड व जागा भाड्याने देऊन ती पोलिसांपासून लपविल्याने कारवाई
मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील ओसाड माळरानावर गेल्या काही दिवसांपासून पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या फिनेल निर्मिती करणाऱ्या उद्योगावर नार्कोटिक्सने कारवाई केली. अल्प्राझोलम नामक रसायन येथे बनवून ते परराज्यात पाठविण्यात येत असल्याची बाब या तपासात निदर्शनास आली. याच पार्श्वभूमीवर आता शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. अल्प्राझोलम नामक केमिकलबाबत कोणतीही माहिती पोलिसांना न देता, शेड व जागा भाड्याने दिल्याने जागा मालक बाळासाहेब रामदास मिडगुले यांची चौकशी सुरू केली आहे. वेळ पडल्यास त्याला अटकही केली जाईल, असे सांगितले. (Shirur News) जिल्हा पोलिसांकडून प्रत्येक जागा मालकांना जागा भाड्याने देताना करार करणे बंधनकारक केले असताना, बाळासाहेब मिडगुले यांनी पोलिसांपासून ही माहिती लपविल्याने, त्यांना बोलावून घेतले असून कारवाई प्रस्तावीत असल्याचेही शिक्रापूर पोलिसांनी सांगितले
अल्प्राझोलमचा वापर
स्मरणशक्ती बिघाड, गुंगी, नैराश्य, संभ्रम याच्या उपचारार्थ आणि मेंदूतील चेतापेशींमध्ये संदेशवहनाची रासायनिक प्रक्रिया उत्तम घडवून आणण्यासाठी अल्प्राझोलमचे डोस रुग्णांना दिले जातात. (Shirur News) अल्प्राझोलमचा वापर ड्रग्जमध्येही केला जातो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात
Shirur News : सुगरणींची खोपे देताहेत विणीच्या हंगामाची चाहूल…!