Shevgaon News : शेवगाव : शेवगांव शहरात आज (शुक्रवार) पहाटे भर वस्तीत मारवाड गल्ली दरोडा पडला. यात दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शेवगाव हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली आहे.
शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत दरोडा
दरोडेखोरांनी गोपी किशन गंगा किशन बलदवा व त्यांच्या मोठ्या वहिनी पुष्पा हरिकिशन बलदवा (वय 65) यांना निर्घृण मारहाण केल्याचे दिसते. या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. (Shevgaon News) त्याचबरोबर सुनिता गोपीकिशन बलदवा या घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर आहे.
शेवगाव शहरातील बाजारपेठेमध्ये राहत्या घरी रात्री तीन ते चारच्या दरम्यान दरोडा पडला. भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगा किशन बलदवा (वय 55) यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला. (Shevgaon News) दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
या घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, “शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. (Shevgaon News) पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा,” शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार ; जमिनीच्या व्यवहारातून घडला प्रकार