Satara News : सातारा : महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहे. आता सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पीडितेच्या पतीला दुसऱ्या खोलीत डांबल्याचे समोर आले आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. Satara News
पीडित महिला रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती दिली जात आहे. हा प्रकार १८ दिवसांपूर्वी घडला असून, पीडित महिला, तिचा पती आणि पाच वर्षांची मुलगी जेव्हा रायगडमध्ये पोहोचले. तेव्हा तिने हा प्रकार तिच्या मामाला सांगितला. त्यानंतर आज पहाटे सातारा पोलिसांनी तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. यामध्ये कोळसा उत्पादन करणाऱ्या मालकासह पाच जणांविरुद्ध महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. Satara News
महिला आणि तिचे कुटुंबीय कारखान्यात कामाला..
पीडित महिला, तिचा नवरा आणि सासू-सासरा आणि मुले हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका कोळसा उत्पादित करणाऱ्या कारखान्यात काम करतात. १८ दिवसांपूर्वी महिलेवर कोळसा कारखान्याच्या मालकांसह पाच जणांनी बलात्कार केला. इतकेच नाहीतर या आरोपींनी महिलेच्या नवऱ्याला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवल्याचाही आरोप आहे.
पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात..
दरम्यान, याप्रकरणाची माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना मिळताच त्यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना ही घटना सांगितली. यानंतर कोळसा कारखान्याचा मालक बाळू शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सातारा पोलिस करत आहेत. Satara News