Satara News : सातारा : बुलढाण्यातील सिंदेखड राजा येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटनेतून सावरत असतानाच साताऱ्यात एका खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे- बंगळुरु आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळजवळील ट्यूब कंपनीजवळ कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. यात झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, ड्रायव्हरसह चारजण जखमी झाले आहेत.
शिरवळ नजिक झाला अपघात
या अपघातात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला असून, सुरज भीमराव शेवाळे (वय २७, रा. टाळगाव शेवाळेवाडी, कराड ) असे त्याचे नाव आहे. (Satara News) तर राजश्री अनिल मोरे (वय २९, मु.पो. कराड, शंकर आनंदा बागडे (वय ४५, मु. पो. शिराळा). अमित महादेव पवार (वय २९, मु.पो. किंद्रेवाडी), अंकुश पाटील (वय ४८, मु. पनुंबरे, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण ट्रॅव्हल्समधून पुण्याहून आपल्या गावाकडे निघाले होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या कंटेनरला (एनएल ०१ जी ४०६९) शिरवळजवळील ट्यूब कंपनीजवळ ट्रॅव्हल्सने (एमएच ०१ डीआर ०१०८) पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. (Satara News) हा अपघात आज शनिवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात ट्रॅव्हलच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.
पहाटे घडलेल्या अपघाताची माहिती समजताच शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगावडे व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्य तात्काळ घटनास्थळी हजर झाले. (Satara News) त्यांनी तातडीने जखमींना शिरवळ येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शिरवळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. अपघातग्रस्त ठिकाणी शिरवळ परिसरातील नागरिक मदतीसाठी आले होते. (Satara News) या घटनेची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले आहेत. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : हृदयद्रावक! महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू