Saswad News : सासवड : काळेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील साईकृपा पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकमधून ४ अज्ञात चोरट्यांनी डिझेल चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.२८) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Thieves stole diesel from a truck parked at a pump in Kalewadi; The incident was caught on CCTV)
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात ४ चोरट्यांच्या विरोधात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील साईकृपा पेट्रोल पंपावर शनिवारी (ता.२७) एक ट्रक पार्क करण्यात आला होता. (Saswad News) मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी एक टाटा टेम्पो आला. त्या टेम्पोमधून चार जण खाली उतरले. चोरट्यांनी पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेलच्या टाकीचे लॉक तोडले. आणि ट्रकमधील डिझेल चोरी करून पळून गेले. दरम्यान, ही चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
सासवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन
काळेवाडी येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील टेम्पो व चोरट्यांबाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी तत्काळ सासवड पोलिसांना माहिती द्यावी. अथवा 9923885781 / 9923892525 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. (Saswad News) असे नागरिकांना आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोलप यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :