Saswad Latest News : सासवड, (पुणे) : बैलगाडा शर्यतीदरम्यान धावपट्टी सोडून सुसाट वेगात धावणारी बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने एका २१ लाख रुपयांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका बैलाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. शिवरी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (ता. १२) रात्री हि घटना घडली आहे.
बैलगाडीवरील नियंत्रण सुटले व थेट विहिरीत जाऊन कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे गुरुवारी लगाडा शर्यत भरवण्यात आली होती. शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाडीवरील नियंत्रण सुटले व बैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतकी भयानक होती, की यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, बैलगाडीला थांबवण्यासाठी गेलेल्या संदीप न्यानोबा कामथे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली. त्यामुळे या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बैलाची किंमत हि २१ लाख रुपये होती.