Sasvad News : लोणी काळभोर, (पुणे) : कृषीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या ‘‘महावितरणच्या’’ टॉवरमधील अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीच्या सासवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ टेम्पोसहित ६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Sasvad News)
सोहेल उर्फ लादेन मोदीन आसंगी, वय – २२) आदित्य उर्फ सोन्या खंडु कांबळे, वय -२०), सुरज उर्फ बॉम्ब नंदु बांदल वय- १८ रा. तिघेही पाटील हेअरटेज, इंद्रायणीनगर कमानीच्या जवळ, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे), दत्ता धनाजी पाटोळे (वय-१९, रा. जय भवानी मित्र मंडळजवळ, तळजाई वसाहत, पदमावती, बालाजीनगर), समाधान दगडु कसबे वय- ४७), ओम उर्फ शिवम समाधान कसबे, (वय-१९, रा. दोघेही शंकर महाराज वसाहत, मठाजवळ, धनकवडी), दिलीप दत्तु देडे, वय – ३८ रा. साई पॅलेस, पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, धनकवडी), सालीक राम लहुरी सरोज (वय – ४४, सध्या रा. त्रिमुर्ती जिमजवळ, वाघोली, मूळ रा. कंजिया, अटरामपुर नबाबगंज इलाहबाद (राज्य-उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश नामदेव गायकवाड, सहायक अभियंता महापारेषन विदयुत कंपनी पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Sasvad News)
पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २३ रोजी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गराडे, तरडेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील टॉवरच्या २१ लाख ४० हजार रुपयांच्या अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची तक्रार गायकवाड यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Sasvad News)
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस ठाण्यातील अंमलदार व गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघड़किस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टी.व्हि. फुटेज तपासून चोरटयांचा एक संशईत टेम्पोची माहिती मिळाली. टेम्पोचा तपास करीत असताना कात्रज परीसरातील जावेद शेख व समाधान कसबे हे दोघे काही लोकांना हाताशी धरून मागील १ वर्षा पासून गराडे येथिल रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवुन शासनाच्या मालकिच्या विज वाहक अॅल्युमिनीअमच्या तारा दोन टेम्पोमधुन चोरी करून नेतअसल्याची माहिती मिळाली.
त्याप्रमाणे पथकाने पदमावती, तळजाई, शनीनगर, कात्रज, कोंढवा पुणे येथे जाऊन खबऱ्याकडून माहिती घेवुन शोध घेतला असता संशईत आरोपी व गुन्हयातील टेंम्पो मिळुन आले. आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले त्यांना सासवड पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा आम्हीच केला असुन आम्हीच गराडे, ता पुरंदर येथिल विज टॉवरमधील अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा चोरली अशी कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २ टेम्पोसहित ६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस हवालदार लियाकतअली मुजावर, गणेष पोटे, अभिजीत कांबळे, रूपेश भगत, निलेश जाधव, जब्बार य्ययद, सुरज नांगरे, रमेश कर्चे, विक्रम भोर, प्रकाष यादव, संजय दाने, पोलीस मित्र ऋषिकेष जगदाळे, संतोश गोफने, श्रीकांत भंडलकर, राहुल भुजबळ, प्रषांत चौरे, राजेंद्र शिंदे, होमगार्ड लोखंडे, महेश पोमण, सागर ताम्हाणे यांचे पथकाने केलेली आहे.