Sangli News : सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील जवानाने कर्तव्य बजावत असतानाच स्वत:वर गोळी झाडून घेऊन आपले जीवन संपवले. मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय २३) असे या जवानाचे नाव आहे. या घटनेने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात केली आत्महत्या
यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर डोंबाळे हा दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशसेवेसाठी रूजू व्हावे, ही त्याची इच्छा होती. (Sangli News) त्याची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात होती. तेथील महेश्वर सैन्य शिबिरात त्याने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.
कुटुंबीयांना ही बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. (Sangli News) त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
मयूर डोंबाळे यांना आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी, सरपंच अशोक यमगर, उपसरपंच नारायण यमगर, तासगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. माळी, ग्रामसेवक दीपक जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुभेदार मेजर आनंदराव पाटील, १४ मराठाचे नायब सुभेदार बाबासाहेब वावरे, (Sangli News) अर्जुन यमगर, पोलिस पाटील संजय यमगर यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sangli News : सांगली हादरले ! विषप्राशन करुन नवविवाहीत पती-पत्नीची आत्महत्या
Sangli News : सव्वा लाख रुपयांची लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले
Sangli News : चकना आणण्यासाठी गेला अन् मोबाईलसह दुचाकीही घेवून झाला पसार