Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : तृतीयपंथी कलाकारांच्या नृत्याविष्काराची रसिकांवर मोहिनी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 17:43

Nagpur News  : नागपूर : सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र, आपल्या समाजातील गैरसमजुतीमुळे आजही तृतियपंथी समुदायाला तुच्छ नजरेने बघितले जाते. कॉलेजमध्ये एखादा असा मुलगा शिकत असेल, तर त्याला त्रास दिला जातो. त्यांच्या संवेदना, सुप्त कलागुण, त्यांच्यातील माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न कधी होत नाही. प्रत्येक माणसात वेगळेपण असते. हे वेगळेपण जपत आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केल्यास समाजात मानसन्मान मिळतो. याच भावनेतून नागपुरात मुद्रा डान्स ग्रूप अस्तित्वात आला. आज या ग्रूपच्या माध्यमातून ५० हून अधिक तृतीयपंथी कलाकार लोकांचे मनोरंजन करत आहेत. समाजाने उपेक्षित घटक म्हणून हिणवले, तरी आपली कलाच आपली ताकद बनेल, या विश्वासावर हे कलाकार लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

उपेक्षित म्हणून हिणवले; पण कला पाहून भारावले…!

कर्तव्य म्हणून प्रत्येकाने उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांप्रती सामाजिक जाणिवेतून काम केले पाहिजे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे, हे मुद्रा ग्रूपच्या कलाकारांनी दाखवून दिले आहे. या कलाकारांच्या मते, प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. (Nagpur News ) आम्हाला ईश्वराने वेगळे निर्माण केले आहे. स्त्रियांप्रमाणेच सौंदर्य आम्हालाही दिले आहे. आमच्याही अंगी विविध कला आहेत. या कला लोकांपुढे सादर करता याव्यात. या भावनेतून आम्ही एकत्र येत डान्स ग्रूप तयार करण्याचा निर्णय घेतला.

डान्स ग्रूप तयार करण्यापूर्वी आम्ही श्रद्धा जोशी यांच्याशी चर्चा केली. सात जणी एकत्र येऊन ममत्त्व फाउंडेशनअंतर्गत मुद्रा डान्स ग्रूपची स्थापना केली. त्यानंतर आता ५० हून अधिक तृतीयपंथी भगिनी या ग्रुपमध्ये आहेत, असे मोहिनी हिने सांगितले. आमच्यामधील प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या क्षेत्रात एक उत्तम कोरिओग्राफर, डान्सर, अॅक्टर, मॉडेल आहे. तसाच तो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपल्यातील कला जोपासत आहे. (Nagpur News ) मी स्वतः एक तृतीयपंथी समाजसेवक म्हणून काम करते, असेही मोहिनीने सांगितले.

 

कलाकाराचा सन्मान हेच या ग्रूपचे ध्येय आहे. लिंग, जात, धर्म यावरून येथे भेदभाव होत नाहीत. फक्त कलेला वाव दिला जातो. नागपूरातील साउथ सेंट्रल झोन येथे त्यांनी पहिले प्रात्यक्षिक सादर केले. (Nagpur News ) त्यानंतर कला क्षेत्रातील अनेक धागे उलगडत गेले. कुरुक्षेत्र येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात देखील या कलाकारांनी कला सादर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव येथे आयोजित केला होता. येथे या कलाकारांचे तोंडभर कैतूक झाले.

आपल्या कलेच्या माध्यमातून या कलाकारांनी आज स्वतःला सिद्ध केले आहे. समाजाने देखील आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून निसर्गाच्या निर्मितीचा स्वीकार करावा, अशी नम्र भावना या कलाकारांनी व्यक्त केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagpur News : वडिलांचा अबोला मुलाच्या जिव्हारी बेतला… तो कायमचाच अबोल झाला; दहावीतील मुलाने उचलले टोकाचे पाऊल…!

Nagpur News : नागपूर हादरले! खेळताना तीन मुलं झाली बेपत्ता, तिघांचेही मृतदेह आढळले कारमध्ये; अपघात की घातपात s??

Nagpur News : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार? काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

PMPL News : पुणे ते पारगाव यादरम्यान "पीएमपी''च्या फेऱ्या वाढवाव्यात - विविध प्रवासी संघटनांसह नागरिकांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.