Sangli News : सांगली : दारू पिणारे एकत्र टेबलवर भेटले की त्यांची लगेच मैत्री होते असे बोलले जाते. लगेच ते एकमेकांचे घट्ट मित्र होवून वाटेल ते करायलाही तयार होतात. त्यांचा एकमेकांवर विश्वास देखील लगेच बसतो. मात्र अशा वेळी फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. असाच अनुभव महापालिकेच्या एका कर्मचार्याला मिरजेत आला. दारूसोबत अत्यावश्यक असलेला चकना घेउन येतो असे सांगून महापालिकेच्या कर्मचार्याचा मोबाईल आणि 80 हजाराची
दुचाकी लंपास केल्याचा प्रकार मिरजेत घडला आहे.
मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, महापालिकेच्या श्वान पथकात कार्यरत असलेले कर्मचारी हेमंत सर्वदे हे मिरजेतील रेवणी गी येथे दारू पिण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे दारू पिण्यासाठी आलेल्या एका इसमाशी तोंडओळख झाली. (Sangli News) दोघेही पित बसले होते. यावेळी अज्ञातांने घरी फोन करायचा आहे असे सांगून सर्वदे यांच्याकडील भ्रमणध्वनी मागून घेतला. यानंतर घरातून चकना घेउन येतो असे सांगून दुचाकीची चावीही मागून 80 हजाराची स्प्लेंडर दुचाकी घेउन पसार झाला. बराच काळ प्रतिक्षा केल्यानंतरही चकनाही नाही, दुचाकीही नाही आणि भ्रमणध्वनीही गायब. यामुळे त्रस्त झालेल्या सर्वदे यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sangli News : समाजात अजूनही अज्ञान, भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू