पुणे : पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग परिसरात दरोड्याच्या तयारी प्रकरणातील आरोपीला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जमीन मंजुरीचे आदेश जिल्हा न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
दिप्या उर्फ दीपक रमेश कांबळे असे जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.पुणे सेंट्रल बिल्डिंग परिसरात अज्ञात आरोपी २८ जून २०२२ रोजी दरोडाच्या तयारीत आहेत,आणि त्यांच्याजवळ मिरची पावडर, कटर, लोखंडी रॉड, सह व इतर धारदार शस्त्र बाळगळी आहेत. पुणे स्टेशनकडून कॅम्पकडे येणाऱ्या-जाण्याऱ्या पादचारी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती क्राईम ब्रँच युनिट दोनला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केले होते.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी दिप्या उर्फ दीपक कांबळे हा मिरची पावडर व लोखंडी रॉड घेऊन अंधारात पहारा देत बसला होता. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. एका महिन्यानंतर क्राईम ब्रँचने आरोपी दिप्या उर्फ दीपक कांबळे याला अटक केली. व त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. आरोपीने जमीन मंजुरीसाठी अॅड. राकेश सोनार यांच्या मार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
त्यानंतर सदर गुन्ह्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांच्या खंडपीठात सुरु होता. आरोपीच्या वतीने अॅड. राकेश सोनार यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना असे निदर्शनास आणून दिले की, सदरच्या गुन्ह्यात आरोपी हा सराईत या कारणावरून अटक केला आहे, आरोपीने असा कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही. असा न्यायालयात युक्रिवाद केला.
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी दीपक उर्फ दिप्या रमेश कांबळे यास जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. राकेश सोनार, अॅड. महेश देशमुख अॅड. सुदर्शन खाडे व अॅड. वैभवी वंडकर यांनी काम पहिले.