( Rahul Kul ) पुणे : पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात भष्ट्राचार झाला असून आमदार राहुल कुल यांनी ५०० कोटींचा मनी लाँड्रीगचा घोटाळा केला आहे. असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राहुल कुल यांची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फेत करावी. अशी मागणी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात भष्ट्राचार….
आमदार राहुल कुल यांनी भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात सन २०१६ ते २०२२ या कालावधीत गळीत हंगाम बंद असताना खुल्या बाजारात साखरेची विक्री केली आहे. कारखान्याने बॅंकांचे थकीत कर्ज बुडवले, असा आरोप राऊतांनी फडणवासींना पाठविलेल्या पत्रात केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राऊत यांनी काल टि्वट करीत राष्ट्रीय तपास यंत्रणा, भाजपवर टीका केली होती. “आपणही एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार आहोत,” असे संजय राऊतांनी टि्वटमध्ये म्हटलं होते. राऊतांनी टि्वटमध्ये हसन मुश्रीफ यांचा फोटो पोस्ट केला आहे.
प्रिय देवेंद्र जी
आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे..
Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत.
शेतकऱ्यांच्या फसवणकीस सरकारी पाठींबा आहे का?कारवाई करा!@Dev_Fadnavis pic.twitter.com/AeiV3gjxaJ
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमके आहे तरी काय ….
भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे, या मताचा मी आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. ने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार – गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग’ आहे.
कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.
मा. देवेंद्र जी
भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@dir_ed@PMOIndia@AUThackeray@AjitPawarSpeaks@AmitShahOffice pic.twitter.com/1eJg969EBu— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी.
असे पत्रात राऊत यांनी नमूद केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
कुलूपाची चावी खिडकीत ठेवणे पडले महागात ; पुण्यात घडली ही धक्कादायक घटना..!