Pune News : पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने पत्नीने सोसायटीच्या जिन्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रविवार पेठेत घडली आहे.
खिडकीला दोर बांधून गळफास
सुलभा सुरेंद्र पुजारी (वय ४२, रा. वैष्णव अपार्टमेंट, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी (वय ४२), दीर समीर, सासू रजनी यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे (वय ४४, रा. गणेशनगर, उस्मानाबाद) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पुजारी आणि त्याचे कुटुंबीय सुलभा यांचा छळ करीत असल्याचा करीत होते. सुरेंद्रने सुलभाला घरातून हाकलून दिले. सुलभा तीन दिवस सोसायटीच्या जिन्यात राहत होत्या. त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते.
तीन दिवसांपूर्वी सुलभा यांनी जिन्याच्या शेजारी असलेल्या खिडकीला दोर बांधून गळफास घेतला. सुलभा यांचा भाऊ रवी यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ते पुण्यात आले. चौकशीत सुलभा यांचा छळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर रवी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.