Pune News : पुणे : वारजे माळवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन, दोन पिस्टल आणि ७ काडतुसे जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे या दोन सराईत गुन्हेगारांच्या अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून दोन लोखंडी हत्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुरज शिवाजी भरडे (वय-२३ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राहुलनगर, शिवणे, पुणे), अनिकेत अनुरथ आदमाने (वय-२१ रा. पाडुरंग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune News ) याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलिसांकडून हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार श्रीकांत भांगरे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सुरज भरडे व त्याचा अल्पवयीन साथिदार हे धनगरबाबा बस स्टॉपच्या मागील एनडीए मैदानावर उभे असून, सुरज भरडे याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे व पथकाने सापळा रचून आरोपी सुरज भरडे याला ताब्यात घेऊन, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ काडतुसे आढळून आली. तर अल्पवयीन मुलाकडे लोखंडी हत्यार आढळले. (Pune News ) पोलिसांनी पिस्टल, काडतुसे आणि लोखंडी हत्यार जप्त केले आहे.
या कारवाईदरम्यान, पोलीस अंमलदार विजय भुरुक यांना मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत आदमाने वारजे स्माशनभुमीसमोरील पुलाखाली उभा असून त्याच्याकडे पिस्टल व काडतुसे असून, त्याच्या साथिदाराकडे लोखंडी हत्यार असल्याचे कळले.(Pune News ) त्याआधारे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे व त्यांच्या पथकाने सापळा रचून अनिकेत आदमाने व त्याच्या साथिदाराला ताब्यात घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल; ११ कोटी २३ लाखांचा अपहार
Pune News : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीकडून ९६ जादा गाड्या सोडणार…