Pune News : पुणे : कंपनीचे गेट उघडण्यास उशीर झाला, या कारणावरून चौघांनी सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करत, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत गार्डला अॅम्ब्युलन्समधून चाकण येथील हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव अमोल पानझाडे (वय ३५, रा. खराबवाडी, ता. खेड) असे आहे. हा प्रकार खराबवाडी येथील फतेजा फोर्जिंग कंपनीच्या गेटवर रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी हनुमंत आबुजे (वय ५५, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी (Pune News) म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी सिक्युरिटी गार्ड अंक्या व त्याच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गंभीर जखमी असेलेले अमोल पानझाडे व फिर्यादी हे दोघेही भोसरी येथील मातोश्री सिक्युरिटी या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांची नेमणूक फतेजा फोर्जिंग कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून झाली होती. (Pune News) ही कंपनी बंद पडली. कंपनीच्या पाठीमागेच फतेजा मॅडम राहतात. त्यांचा सिक्युरिटी गार्ड त्याच्या तीन साथीदारांसह कंपनीच्या गेटवर रात्रीच्यावेळी आला होता.
दरम्यान, पानझडे त्यावेळी जेवत असल्यामुळे त्याला गेट उघडण्यास वेळ लागला. या कारणावरुन अंक्या याने पानझडे याला शिवीगाळ केली. (Pune News) चौघांनी अमोल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अंक्याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने अमोलच्या डोक्यात जोरदार वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
फिर्यादी यांनी अंक्याला विचारल्यावर त्याने गेट लवकर उघडले नाही म्हणून मारहाण केली. या भांडणात अमोल हा बेशुद्ध पडला. (Pune News) त्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्समधून चाकण येथील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तरुणाचे अपहरण करून, निर्जन स्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Pune News : नवले पुलाजवळ मोटारीच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू