Pune News : पुणे : पुणे परिमंडळात वीज चोरी करणाऱ्या ७६६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत महावितरणने २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वीज चोरी करणाऱ्यांना केला आहे. त्यातील ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
७६६ जणांवर गुन्हा दाखल
महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी सुरु असलेली मोहीम कायमस्वरुपी राबण्यात येणार आहे. यामुळे वीज चोरी करू नका, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.