Pune News : पुणे : राज्यात गुन्हेगारी घटनांप्रमाणेच हत्याकांडाच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबतची एक आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुंबईत सर्वाधिक ६८ हत्याकांड झाली असून, दुसऱ्या स्थानावर पुणे आहे. पुण्यात ४२ हत्याकांड झाली आहेत, तर पुण्याच्या खालोखाल ठाण्यात ३९ हत्याकांड झाल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.
ठाणे तिस-या क्रमांकावर
शिक्षणाचं माहेरघर आणि शांतताप्रिय अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पाहता ही ओळख आता कायम राहिलेली नाही. (Pune News) मागील काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यात सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सायबर क्राईम आणि विनयभंगाच्य गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. यात आता हत्याकांडाच्या गुन्ह्यांमध्येदेखील पुणे आघाडीवर असल्याचे वास्तव समोर आले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. यात आतापर्यंत हजारो गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँग सक्रिय आहे. पुण्यातील विविध परिसरांमध्ये त्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यांच्यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. मात्र, या टोळीतील लोक अजूनही पुण्यातील रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसत आहेत. या सगळ्या घटनांमुळे शांतताप्रिय अशी पुण्याची ओळख पुसली जात आहे.
राज्यात देखील पिस्तूल, तलवार, कोयता गॅंग यासारख्या शस्त्रासह वावरणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीसांच्या कतृत्वावर संशय व्यक्त केला जात आहे. (Pune News) राज्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची वाढती संख्या बघता गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून हालचाली होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
राज्यभरातील सहा महिन्यांची आकडेवारी लक्षात घेता मे महिन्यात सर्वाधिक (४२) हत्याकांड घडल्याचे निदर्शनास येत आहेत. मुंबईत सर्वाधिक (१८) तर ठाण्यात (१२) खुनाच्या घटना मे महिन्यात घडल्या आहेत. (Pune News) तसेच पुण्यात (११) आणि नागपुरात (६) हत्याकांड घडले आहेत. तर जानेवारीतसुद्धा राज्यातील चार प्रमुख शहरांत ३६ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत.
नैतिक संबंध, प्रेम संबंध किंवा शारीरिक संबंध हे हत्येचे कारण ठरल्याचे समोर येत आहे. कौटुंबिक कारणातून घडलेल्या हत्याकांडात प्रियकर, नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे. तसेच बऱ्याच घटनांमध्ये जुने वैमनस्य, संपत्ती आणि पैशाचा वाद असल्याचे कारण समोर आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जंगली रमीचा नाद कॅब चालकाला पडला महाग; २० हजार रुपये हरल्याने आत्महत्या…!