Pune News : पुणे : आम्ही परिसरातले भाई आहोत. आमची तक्रार केली, तर तुम्हाला मांजरीमध्ये राहू देणार नाही… अशी धमकी देत हडपसर परिसरात नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दहशत माजवून धाकदपटशहा दाखविणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या ५ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मांजरी रस्त्यावरील नवीन ओव्हर ब्रिजवर मोबाईल पाहत थांबले असता, तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. एकाने त्यांना पकडले आणि दोघांनी हातातील मोबाईल हिसकावला. आम्ही या परिसरातले भाई आहोत. (Pune News) आमची तक्रार केली, तर तुम्हाला मांजरीमध्ये राहू देणार नसल्याची धमकी दिली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरमयान, गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना, युनिट पाचच्या पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल बाळासाहेब आडेगावकर (वय ३०, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे), रोहन भगवान थोरात (वय-२०, रा. मांजरी बुद्रूक), गणेश गौतम कोरडे (वय-२२, रा. म्हातोबाची आळंदी), आशितोष विक्रम गजरे (वय-२२, रा. रंगीचा ओढा, मांजरी), मंगेश गणेश मोरे (वय-२२, रा. कल्याणी स्कूलजवळ, मांजरी) यांना सापळा रचून अटक केली.
सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन अमोल आडेगावकर याने हडपसर, मांजरी परिसरात दहशत माजवली. वर्चस्व वादातून संघटीत तसेच संयुक्तपणे गुन्हे केले. गुन्हेगारी टोळीने खून, शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घरफोडी, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, शस्त्राचा धाक दाखवून पैसे मागणे, लहान मोठे व्यवसायिक तसेच पथारीवाले यांना दमदाटी करणे, अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. (Pune News) त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शालेय पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : काकूला धमकावून पुतण्याने केला बलात्कार; पैसेही उकळले; गुन्हा दाखल