Pune News : पुणे : एका भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. (In Pune, a speeding two-wheeler blew up an old woman, she died during treatment, the incident was caught on CCTV camera.)
उपचारादरम्यान झाला मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये ती महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, (Pune News) मात्र त्याचदरम्यान एका भरधाव दुचाकीने तिला उडवले.
ही घटना पुण्यातील कर्वेनगर भागात घडली. पुण्यातील या परिसरात अल्पवयीन मुलांकडून बेदरकारपणे वाहने चालवली जात आहेत.(Pune News) एक महिला या निष्काळजीपणाची बळी ठरली, ज्यात तिला आपला जीव गमवावा लागला.
याप्रकरणी बेफिकीर वाहनचालक आणि सायलेन्सर व हॉर्न वाजवून आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंगणे होम कॉलनीतील रहिवाशांकडून होत आहे. (Pune News) अशा बेफिकीर वाहनचालकांवर तातडीने कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील व्यावसायिकाला बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे पडले महागात