Pune News : पुणे : पत्नी चांगली, टापटीप राहत नाही, ती दिसायला सुंदर नाही, म्हणून तिला सतत टोमणे मारून छळ करणाऱ्या एकाला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीला दरमहा आठ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कौटुंबिक न्यायालयात पत्नीने दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयाने त्वरित निर्णय दिला आहे.
न्यायालयाने त्वरित निर्णय दिला
तक्रारदार महिलेचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर किरकोळ कारणावरुन पतीने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पत्नी चांगली राहत नाही, तसेच दिसायला सुंदर नसल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करण्यास सुरुवात केली. (Pune News ) त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. महिला पतीवर अवलंबून होती. उदरनिवार्हाचे साधन नसल्याने तिला पोटगी मिळावी, असा अर्ज ॲड. कांबळे यांनी न्यायालयात सादर केला.
पती खासगी कंपनीत नोकरी करत असून, पत्नीकडे उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याची मागणी पत्नीने केली होती. पत्नी शिवणकाम, तसेच ब्युटीपार्लरचे काम करते. दरमहा मिळणाऱ्या वेतनातून आईचे उपचार केले जातात. (Pune News ) घरखर्चाची जबाबदारी सांभाळावी लागते, असे पतीने न्यायालयात सांगितले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकून पत्नीला दरमहा आठ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : व्यापार व आर्थिक विकासाला चालना देण्यात मानकांची भूमिका महत्त्वाची : ज्ञान प्रकाश
Pune News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी कानगावात तीन ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा