Pune News : पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात चोरलेले मोबाईल विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका सराईत मोबाईल चोराला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे तब्बल २० मोबाईल संच जप्त केले आहेत.
२० मोबाईल संच जप्त
पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. धमेंद्र लालबिहारी साह (वय-२४, सध्या रा. दांडेकर पूल, मुळ रा. मुझफ्फरपूर, बिहार) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानक परिसरात चोरीचे मोबाईल विक्री करण्यसाठी एकजण येणार असल्याची माहिती पुणे लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून आरोपी धमेंद्र साह याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २० मोबाईल आढळले. सखोल चौकशी केली असता, त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. (Pune News) मोबाईल विकून मूळगावी जाणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय अधिकारी देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक वासनिक, सहायक निरीक्षक झोडगे, पोलीस अंमलदार कदम, दांगट, टेके, कांबळे, बोरनारे, बिडकर, मधे, केंद्रे यांच्या पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ड्रग तस्कर ललित पाटीलचे नेपाळला पलायन? गुन्हे शाखेची दहा पथके मागावर!