Pune News : पुणे : चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. तमाशा व्यवसायात गुंतवणूक करा, तुम्हाला नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका दाम्पत्याला तब्बल साडेचार लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर नफा न देता गुंतवणूकदार व्यक्तींची फसवणूक केल्याची घटना नुकतीच कोंढवा येथे घडली.
कोंढवा येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहील तांबे व आमन तांबे (रा. कुबेरा गार्डन, एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुधीर शाम रावत (वय ६२, रा. एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि फिर्यादी हे कोंढवा परिसरात राहतात. (Pune News) आरोपींनी गोड बोलून फिर्यादी व त्यांच्या पत्नीसोबत ओळख वाढवली. हळूहळू त्यांच्याशी मैत्री केली. हळूहळू आरोपी राहील तांबे आणि आमन तांबे यांनी रावत दाम्पत्याला तमाशा फडाचा व्यवसाय सुरु करुन त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी ४ लाख ४० रुपये आरोपींना दिले. ही घटना २०१४ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली.
दरम्यान, पैसे हाती आल्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा दिला नाही. फिर्यादी व त्यांच्या पत्नीची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्पेअरपार्टची दुकाने असल्याचे भासवून ३५ लाखांची फसवणूक
Pune News : ऐन सणांत वीजदरवाढ, प्रति युनिट ‘इतके’ पैसे द्यावे लागणार..
Pune News : ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीची स्थापना; ८० जणांच्या जबाबांची नोंद