Pune News : पुणे : रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा या श्वानाने भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेसमधून होत असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर यशस्वीरित्या पकडली. या वेळी तब्बल ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला.
वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी केले श्वानपथकाचे कौतुक
भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस पुणे स्थानकात आल्यावर रेल्वे सुरक्षा दलाचे पथक द्रोणा श्वानासोबत गाडीची नियमित तपासणी करीत होते. गाडीतील जनरल डबा तपासत असताना एक ट्रॉली बॅग आढळली. श्वान द्रोणाने वासावरून ट्रॉलीमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा हँडलर केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तपासणी केली असता, या बॅगेमध्ये तब्बल ३२ किलो गांजा आढळला. (Pune News) लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात हा जप्त केलेला गांजा देण्यात आला असून, पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमली पदार्थ कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा या श्वानाने यापूर्वी देखील एका गाडीतून सुमारे दोन किलो अमली पदार्थ पकडण्यास मदत केली होती. या कामगिरीबद्दल त्याचे कौतूक झाले होते. (Pune News) दरम्यान, द्रोणा याने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी द्रोणाच्या कामगिरीबद्दल रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकातील जवानांचे अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पिरंगुट येथे सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू
Pune News : बोहरा समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन