पुणे : विमाननगर परिसरात चायनीज विक्रेत्याला दरमहिना दहा हजाराची खंडणी मागणाऱ्या मोकाच्या गुन्ह्यातील टोळी प्रमुखाला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
समीर शब्बीर शेख वय – २५ रा. येरवडा असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सानी गुलामनबी जोड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. समीर शेख याने ॲड. नितीन भालेराव यांच्यामार्फत विशेष मोक्का न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानी गुलामनबी जोड यांचे गणपती चौक, विमाननगर या ठिकाणी चायनीजचे दुकान आहे. १७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टोळीप्रमुख समीर शेख याचा भाऊ सह-आरोपी शकील शेख हा त्याचे दुचाकी वर फिर्यादीच चायनीज चे स्टॉल वर जाऊन फिर्यादी यास “तुला समीर भाई ने सांगितले आहे जर चायनीज गाडी चालवायची असेल तर दहा हजार महिना खंडणी म्हणून द्यायला सांगितले होते.
यावेळी टोळी प्रमुख समीर याने फोन वरून फिर्यादी यास धमकावले होते व खिश्यातील १२०० रुपये काढून घेतले म्हणून फिर्यादी याने आरोपी याचे विरुद्ध खंडणी मागितल्या बद्दल येरवडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आरोपीवर येरवडा पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती.
आरोपी शकील शेख यास पोलिसांनी २०२२ मध्ये अटक केली होती परंतु मुख्य आरोपी व टोळी प्रमुख शकील शेख हा मागील वर्षापासून फारार होता दरम्यान आरोपी समीर यास येरवडा पोलिसांनी १४ ऑगस्टला पुण्यातून अटक केली होती. आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात केली होती व पोलिसांचा पुढील तपास चालू होता त्यादरम्यान आरोपी शकील शेख याने न्यायालयात जामिनाचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयात दाखल केला होता. आरोपी याने कुठलाही गुन्हा केलेला नसून, गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला आहे.
दरम्यान, गुन्हा घडला त्या वेळी समीर शेख याचा सोलापूर येथे अपघात झाला असल्याने त्याचेवर सोलापुरातील सरकारी रुग्णालयात तसेच त्या नंतर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्या मुळे घटनेच्या दिवशी आरोपी हा रुग्णालयात असल्याचे तसेच पोलिसांनी आरोपीने फोन करून धमकी दिल्याचे कुठलेही पुरावे न्यायलयसमोर आणले नसल्याने आरोपीस जमीन देण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला होता. त्या साठी ससून रुग्णालय व सोलापूर जिल्हा रुग्णालयातील कागदपत्रांचा आधार घेण्यात आला होता.
दरम्यान, आरोपींच्या वाकीलांचा तसेच सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश कचरे यांच्या न्यायालयाने आरोपी समीर शेख यास अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड नितीन भालेराव यांनी दिली आहे. सदर कामी ॲड मयूर चौधरी, ॲड मिथिल बुरांडे यांनी मदत केली.