Pune News : पुणे : आपण लोकसेवक असल्याचे सांगित, रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणांची मोठी फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
५ जणांवर गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास सुग्रीव केंद्रे (वय २८) यांनी फिर्याद दिली होती.(Pune News ) त्यानुसार किशोर गंगाराम आटवे (वय ४४), प्रकाश नारायण राठोड (वय ३९), जितेंद्र अमरीकलाल खोसला (वय ४३), यादव सोनेराव इंगळे (वय ४४), सुनिल हुमचंद कायटे (वय २६) यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गादास लक्ष्मण गावडे (वय-२३) व गणेश बबन गाडवे (वय-२३ दोघे रा. मु.पो. शेळगाव आटोळ, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांना आरोपींनी आपण लोकसेवक असल्याचे सांगितले. दुर्गादास व गणेश यांना पुणे रेल्वेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटरपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. (Pune News ) एवढेच नव्हे तर आरोपींनी दोघांना नियुक्ती झाल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन दिले.
दरम्यान, नियुक्तीपत्र मिळाल्याने सुखावलेल्या दुर्गादास गावडे आणि गणेश गाडवे यांनी नियुक्तीपत्र घेऊन पुणे स्टेशन गाठले. तेथे आल्यानंतर सत्य उघडकीस आले.(Pune News ) दोघांवर पश्चातापाची वेळ आली. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची बालमित्राला धमकी; तब्बल एक कोटींची फसवणूक
Pune News : औषधपुरवठ्यासाठी ‘हाफकिन’ला ६ कोटी मोजले, पण ‘ससून’कडे औषधांचीच वानवा; अहवालात माहिती उघड
Pune News : फेरफटका मारण्यासाठी जायचा अन् तारांकित हॉटेलमध्ये रहायचा… ललित पाटीलचे कारनामे उघड