Pune News : सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेऊन त्याआधारे ३ मोबाईल फोन खरेदी करून तब्बल १ लाख २३ हजारांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडी येथे घडली आहे. हि घटना १९ मार्च ते २४ जुलै या कालावधीत घडली आहे.(Pune News)
१ लाख २३ हजारांची फसवणूक.
याप्रकरणी विकास भास्कर चौतमाल (वय३०, रा. साखरे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. संभाजीनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विष्णू पाडाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौतमाल यांना त्यांचा सिबिल स्कोर चेक करायचा होता. त्यासाठी त्यांनी आरोपी आकाशशी संपर्क केला.(Pune News)
दरम्यान, आरोपी आकाशने फिर्यादी चौतमाल यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. आणि त्या आधारे एक मोबाईल फोन खरेदी केला. खरेदी केलेला मोबाईल रद्द करतो असे सांगून आणखी दोन मोबाईल फोन खरेदी केले.(Pune News)