Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा थरार ; चार गुंडांकडून तरुणांसह पोलिसाला धक्काबुक्की ची चर्चा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 July 2023, 15:09

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती येथील एमआयटी कॉर्नरजवळ दोन गटांत किरकोळ कारणावरून भरदिवसा बुधवारी (ता. २६) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाही यामध्ये धक्काबुक्की झाल्याची चर्चा असून, भरदुपारी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे हाणामारी करणाऱ्यांपैकी एक ग्रुप गुन्हेगारी विश्वात नावाजलेला असल्याचे बोलले जात आहे. Loni Kalbhor News

एमआयटी कॉर्नरजवळील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका बड्या महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर साखळी चोरीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तरुण गांजा पीत बसले होते. या वेळी लोणी काळभोर येथील नामांकित महाविद्यालयातील दोन विद्यार्थी सेवा रस्त्याने निघाले होते. त्यातील एकाचा पाय घसरला. आधारासाठी त्याने शेजारील दुचाकीला पकडले.

या वेळी दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे दुचाकी जमिनीवर पडली. त्यामुळे चार ते पाच जणांनी गाडी पडल्याच्या कारणावरून दोघांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भांडणामध्ये मध्यस्ती करून भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच, “गुन्हेगारी वृत्ती”च्या चौघांकडून वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुपारी दोनपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अशा घटना होत असल्याने पोलिसांचा गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक राहिला नसल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.
गुन्हेगारी वृत्तीच्या चौघांवर कारवाई होणार का?
चारही तरुण हे कदमवाकवस्ती हद्दीतील एका वस्तीत राहतात. लोणी काळभोरसह पुणे शहरातही ते साखळी चोरीसाठी प्रसिद्ध आहेत. चौघांवर साखळीचोरीचे अनेक गुन्हे लोणी काळभोर, हडसपरसह पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची चर्चा आहे. “त्या” गुन्हेगारी वृत्तीच्या चौघांनीही एमआयटी कॉर्नरजवळ हाणामारी केल्यानंतर, लोणी स्टेशन चौकात आरडाओरड करून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की झाल्याची चर्चा असली तरी, त्या ठिकाणच्या वाहतूक पोलिसाने मात्र धक्काबुक्की झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03
Next Post

Scholarship News : माध्यमिक शिष्यवृत्तीतही हवेली तालुका फेल ; साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यापैकी अवघे ३३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp