Pune News : पुणे : आमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यांच्यामार्फत तुला ठार मारले जाईल… अशी धमकी एका मित्राने दुसऱ्या मित्राला दिली. त्याच्याकडून तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रुपये घेऊन फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघड झाला आहे. पुणे येथील घोरपडी परिसरात हा प्रकार घडला असून, तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ६ सप्टेंबर २०२१ ते २ नोव्हेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
घोरपडी परिसरातील प्रकार
याप्रकरणी घोरपडीमध्ये राहणारे हॉटेल डायमंड क्वीनचे मालक मुख्तार हुसेन मोहम्मद (४४) यांनी फीर्याद दिली आहे. त्यांचा बालपणीचा मित्र अब्दुल हुसैन नैमबाडी उर्फ नादीर हा आहे. नादीर याचा बेकरीचा व्यवसाय आहे. तसेच शोयेब मैनुद्दीन आत्तर (रा. बोपोडी, पुणे) आणि इम्रान लतिफ खान (रा. कोंढवा, पुणे) हे ही मुख्तार हुसेन यांचे मित्र आहेत. तिन मित्रांनी मुख्तार यांना एका गृहप्रकल्पाबाबत माहिती दिली. (Pune News) त्यातील स्टीलसाठी ४४ लाख ५० हजार रुपये लागत आहे. हे पैसे तुम्ही दिल्यास आठ दिवसांत तुम्हाला दहा कोटी रुपये परत करेन, असे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा जमिनीच्या खरेदीवरुन त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
दरम्यान, पैसे परत करण्यासाठी मुख्तार यांनी ठराविक दिवस सांगण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली. परंतु मित्र असलेल्या आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. (Pune News) आमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे. त्यांच्यामार्फत तुला ठार मारले जाईल, अशी धमकी दिली. या सर्व प्रकरणात मुख्तार यांची एक कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : औषधपुरवठ्यासाठी ‘हाफकिन’ला ६ कोटी मोजले, पण ‘ससून’कडे औषधांचीच वानवा; अहवालात माहिती उघड
Pune News : फेरफटका मारण्यासाठी जायचा अन् तारांकित हॉटेलमध्ये रहायचा… ललित पाटीलचे कारनामे उघड
Pune News : सणसवाडीत पायी चालणाऱ्या नागरिकांची लूट; काही तासांत दरोडेखोरांना केले जेरबंद