Pune News : आर्मी मध्ये भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी सेवेतून देशसेवेची हि संधी यातून आजच्या तरुण वर्गाला मिळते. मात्र आर्मी भरतीचे आमिष दाखवून तरुणांना फसवून त्यांच्याकडून 1 कोटी ८० लाखाची रक्कम उकळल्याची घटना एकूण ४२ तरुणासोबत घडली आहे.
एकूण 1 कोटी ८० लाखाची रक्कम उकळल्याची घटना
एका ठगाने टेरीटोरिअल आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवत हि फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सर्दन कमांड लायझन युनिट नि उघडकीस आणला आहे. आरोपीला १२ ऑक्टोबर रोजी अटक तासगाव येथून अटक केली असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पांडुरंग कराळे ( वय -४५ रा. स्टेशन रोड, गजानन नगर पाटील मळा ,तासगाव जि. सांगली) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे .महेश पंढरीनाथ ढाके (३५) रा. पाटण) यांनी याकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश ढाके हे काही कामानिमित पुण्यात आले होते, त्यावेळी कोंढवा परिसरातील त्या हॉटेल मध्ये बसले होते . शेजारी असलेल्या टेबलवर आर्मी मध्ये असून माझी आर्मी मध्ये ओळख असल्याची सांगून आमचे नातेवाईक आर्मीमध्ये अधिकारी आहेत, असे सांगत फिर्यादीला मोबाईल नंबर दिला. आणि स्वतःचा नाव पांडुरंग कराळे असे सांगितले.
आरोपी हा एक-दोन दिवसाआड ढाके यांना फोन करून टेरीटोरीअल आर्मी भरती निघणार असून, कोण असेल तर सांगा असे म्हणत होता ढाके यांनी हि बाब आपल्केया मित्राला सांगितली, मित्रांनी आपल्या मुलाला विचार असे सांगितले. आरोपींनी एका उमेदवारांला ६ लाख रु .द्यावे लागतील, असे सांगितले. या नंतर ढाके यांनी आपल्या मित्राच्या मुलाला हि तयार केले, आणि असे करत करत ४२ उमेदवारांनी १ कोटी ८० लाख ढाके यांनी आरोपीच्या हातात दिलेत.
यानंतर कराळे सांगेल त्यावेळी मुलांना आकी टोलनाका बेळगाव येथे घेऊन गेले यावेळी मुलांकडून आर्मी भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील मागवली. या ४२ मुलांची खोटी वैद्यकीय तपासणी अन्य साथीदारांसह केली . परीक्षेसंदर्भात कराळेला विचारले असता त्याने यांची बनावट हॉल तिकीट ना पाठवली त्यानंतर तो परीक्षेसाठी तारखांवर तारखा देत होता. मात्र दरवेळी परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याचे सांगता होता, यानंतर महेश ढाके यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी आपले पैसे परत मागितले. पण पैशाची मागणी केली असता ते देण्यास आरोपी टाळाटाळ करायला लागल्याने ढाके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले
डमी उमेदवार पाठवून पकडले…
अशा पद्धतीने लोकांची फसवणूक होत असल्याची कुणकुण सदन कमांडच्या तपास युनिटला लागली होती. त्यांनी पांडुरंग कराळे चा शोध घेत त्याच्यावर पाळत ठेवली. एक डमी उमेदवार त्यात घुसवून कराळे सांगत ती प्रक्रिया पार पाडली , त्यानंतर आरोपीला जाळ्यात अडकून ताब्यात घेण्यात आले. यावेळी कराळेच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार आढळून आले असून उमेदवारांची कागदपत्रे देखील हस्तगत करण्यात आली आहेत.