पुणे- Pune Extortion News : मानव विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्षाने पोलिस व पत्रकारांची भिती घालुन तब्बल १० लाख रूपयाची खंडणी (Pune Extortion News) मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Extortion News)
दरम्यान, मागील आठ दिवसापूर्वी मुलांची “शालेय कागदपत्रे” शाळेतून काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एका “कथित” पत्रकाराने एका विवाहीत महिलेची ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमुळे पत्रकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संदिप सुदाम कुटे (रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कालुराम दशरथ मलगुंडे (वय-३९, रा. मु.पो. ढोक सांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा रांजणगाव येथील हॉटेल संदीप आणि कारेगाव शिंदोडे गावच्या हद्दीत ८ मे २०२३ ते १० मे २०२३ यादरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कालुराम मलगुंडे यांचा पुतण्या योगेश मलगुंडे याच्या मैत्रीणीने राहत्या घरी ८ मे २०२३ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली होती. दरम्यान, आरोपी संदीप सुदाम कुटे हा सदर ठिकाणी मदतीसाठी गेला होता. त्याने मयत महिलेने लिहिलेली सुसाईड नोट असलेली डायरी ही महत्वाचा पुरावा असताना देखील ती नष्ट करण्याच्या हेतूने गुपचुप स्वतःकडे ठेवली.
त्यानंतर सदरील डायरी पोलिसांना दिली असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली. पोलिसांचे चोरून काढलेले फोटो त्याने फिर्यादीला पाठविले. तसेच पत्रकारांना मॅनेज करावे लागेल अशी भिती दाखवुन फिर्यादीला शिंदोडी येथे पत्रकाराकडे नेले. मात्र, संदीप कुटेने शिंदोडी गावाच्या अलिकडेच फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले आणि पत्रकारांना भेटण्यासाठी तो गेला. तो पत्रकारांना भेटुन आला.
पोलिसांची व पत्रकारांची भिती घालुन तसेच सुसाईड नोट असलेल्या डायरीचा वापर करून त्याने सदरील डायरीमध्ये तुमच्या पुतण्या योगेश मलगुंडेचे नाव आहे. असे सांगुन वेदांता हॉस्पीटलचे बील भरायचे आहे. असे म्हणुन फिर्यादीकडून ३० हजार रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.
त्यानंतर संदीप कुटेने वेळावेळी फिर्यादीला व्हॉट्सअॅप कॉल करून योगेशला वाचवायचे असेल तर माझ्याकडे तात्काळ १० लाख रूपये जमा करा असा तगादा लावला . आरोपी संदीप कुटेने वेळावेळी १० लाखाची मागणी केल्याने फिर्यादी कालुराम मलगुंडे यांनी शिरूर पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली.
दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपी संदिप कुटे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…