Pune News : पुणे : आजच्या डिजिटलच्या युगात अनेक व्यवहार कॅशलेस होत आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. असे असताना पुण्यात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास 200 दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत तिघांना अटक केली.
200 दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वसंत सखा प्लाझा या इमारतीमध्ये लिनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीच्या नावाने आरोपींनी कार्यालय सुरु केले. (Pune News) त्यांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास दोनशे दिवसात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला परतावा दिल्याने अनेकांनी आरोपींवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. पण नंतर त्यांनी परतावा देण्यास टाळाटाळ केली. अशाप्रकारे त्यांनी जवळपास 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी जेधे आणि मागाडे यांचे साथीदार सागर दत्तात्रय गोऱ्हे (वय 31, रा. नेहा कन्स्ट्रक्शन, धनकवडी), महेश लक्ष्मण भोसले (वय 34, रा. विवा सरोवर, जांभुळवाडी, आंबेगाव), ऋत्विक मोहन पांगारे (वय 23, रा. गगन समृद्धी सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक केली आहे.(Pune News) तर लिनक्स ट्रेड युके या कंपनीचा संचालक निलेश जेधे, जीवन मागाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : …अशा सरकारला जनतेने अद्दल घडवावी – खासदार सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र