Pune News : खडकवासला, (पुणे) : किरकटवाडी येथे खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या १२ दलित महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी पाईप आणि दगडाणे ५ जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या असून मारहाण करणाऱ्या पाच जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले आहेत.
गुन्हा दाखल
कैलास हगवणे, त्याची पत्नी स्वाती हगवणे, त्यांची मुलगी, मुलगा आणि मुलाचा मित्र (सर्व रा. किरकटवाडी, नांदोशी रोड, ता. हवेली) असे ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुसुम सागर शिंदे, (रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकटवाडी येथील कल्पक होम सोसायटीतील कामाच्या सेक्युरिटी साठी मार्शल फोर्स सेक्युरिटी एजन्सीच्या महिलांना सोसायटीचे विकसक आसिफ महंमद शिराज पठाण यांनी कामासाठी बोलावले होते. काम सुरू असताना कैलास हगवणे आणि इतर चार जणांनी सेक्युरिटीच्या एजन्सीच्या महिला आणि कामगारांना शिवीगाळ करून काम बंद करण्यास भाग पाडले.
यावेळी कुसुम शिंदे आणि अशी पठाण यांनी कैलास हगवणे यास जाब विचारला असता त्यांच्या इतर साथीदारांनी विकसक विश्व पठाण आणि कुसुम शिंदे आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या इतर महिलांना जातिवाचक शिवीगाळ करत लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केली.
दरम्यान, सेक्युरिटी एजन्सीच्या महिला जखमी झाल्या असून मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात दलित अत्याचार अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील करत आहेत.