Pune Crime | पुणे : पुणे शहरातील कोंढवा भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने रागाच्या भरात पतीच्या पोटात व छातीवर वार केले आहे. यामध्ये पती गंभीर जखमी झाला आहे. रमजानमध्ये खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीला राग अनावर झाला त्यातून तिने हे कृत्य केले आहे.
याप्रकरणी पत्नी नाझमीन इम्रान खान(वय ४३) यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पती उस्मान अमीर खान (वय ७१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
रमजानमध्ये खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कृत्य…
मिळालेल्या माहितीनुसार, पती इम्रान यांच्याकडे पत्नी नाझमीन यांनी सुरु असलेल्या रमजान ईद सणानिमित्त खर्चसाठी पैशाची मागणी केली. याला इम्रान याने पैसे देण्यास नकार दिला यामुळे दोघांत भांडण झाले.
दरम्यान पैसे न दिल्यामुळे राग अनावर झालेल्या पत्नीने पती इम्रान याच्या छाती व पोटावर वार केले. यामध्ये इम्रान गंभीर जखमी झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Murder News | पुणे : भयंकर..! ;या; कारणावरून त्याने केला तिचा