पुणे Pune Crime : शहरात पीएमपी बसमध्ये चोरींच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चोरींच्या या प्रकरणानंतर आता पोलीसांनी कंबर कसली आहे. (Pune Crime) पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोघांच्या मुंढवा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime) या चोरट्यांकडून तब्बल 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. रिक्षामधून या मोबाईलची विक्री करण्यासाठी आले असता त्यांना पकडण्यात आले आहे. (Pune Crime)
अटक केलेल्या चोरट्यांची नावे
हर्षल मनोज पांचाळ (वय 21) व इम्रान शेख (वय 22, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हर्षल व इम्रान हे रिक्षा मधून मोबाईलची विक्री करण्यास आले तेव्हा पोलीसांनी ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडून 15 मोबाईल चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी हे मोबाईल शहरातील चंदननगर बस स्टॅन्ड, केशवनगर व हडपसर परिसरातून चोरी केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime | टँकर चालकाचे महिलेसोबत गैरवर्तन; वाकडमधील प्रकार…