Pune Crime : पुणे : सोसायटीतील मेंटेनन्स खर्च मागितल्याचा कारणावरून टोळक्याने सोसायटीच्या चेअरमनवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०१) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. वारजे पोलीस ठाण्यात ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.(Pune Crime)
६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत बापू कसबे, ओमकार दिलीप जाधव, अनिल संजय जोगदंड, बुधल्या राठोड, अविनाश कांबळे, चंद्रकांत दादु (वय – ५०, रा. म्हाडा वसाहत, वारजे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pune Crime) याप्रकरणी चंद्रकांत दादु याला अटक केली आहे. तर महादेव कसबे (वय ३५, रा. म्हाडा वसाहत, वारजे) असे गंभीर जखमी झालेल्या चेअरमनचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कसबे हे म्हाडा वसाहतीतील त्यांच्या इमारतीचे चेअरमन आहेत. इमारतीमध्ये मागील ८ ते १० दिवसांपासून लाईट व पाणी येत नसल्यामुळे फिर्यादी हे बिल्डींगचे मेन्टेनन्स फीसाठी रेश्मा जगताप यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पाचव्या मजल्यावर राहणारे चंद्रकांत दादु व इतर पाच जणांनी फिर्यादी यांना आमचेकडे बिल्डींगचे मेंन्टेनन्स मागू नका असे म्हणून हातात कोयता घेऊन अनिकेत कसबे याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. कसबे यांची पत्नी, आई, भावाला टोळक्याने मारहाण केली.(Pune Crime)
याविरोधात नंदा संजय जोगदंड यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादु कसबे, शंकर कसबे, पप्पु कसबे, संजय कसबे (सर्व रा. म्हाडा वसाहत, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. महादु कसबे यांनी फिर्यादीचे सासरे यांनी मेंटेनन्स देण्यास नकार दिला.(Pune Crime)
दरम्यान, पगार झाल्यानंतर मेंटेनन्स देतो, असे सांगितले. याचा राग मनात धरुन शंकर कसबे याने फिर्यादीचे सासर्यांना दगडाने नाकावर मानेवर मारहाण केली. महादु कसबे याने फिर्यादीचे मुलाला हातातील बांबुने मारण्यास येत असताना फिर्यादी यांनी अडविले असता त्यांच्या डोक्यात बांबु मारुन जखमी केले.(Pune Crime)