Pune Crime News | पुणे : सुप्रसिद्ध ज्वेलर्स रांका यांच्या दुकानातीलच अकाऊंटंटनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघा अकाऊंटंटनी बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्तींच्या नावावर धनादेश काढून त्याद्वारे तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार ७२५ रुपयांना गंडा घातला आहे.
अमन ओझा आणि देव नारायण दुबे अशी या दोघा आरोपी अकाऊंटंटची नावे आहेत. याप्रकरणी राज दिंगबर देशपांडे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रविवार पेठ शाखेतील घटना…
हा प्रकार रांका ज्वेलर्सच्या यांच्या रविवार पेठ शाखेत १०सप्टेबर २०२० ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज देशपांडे हे रांका ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे अमन ओझा आणि देव नारायण दुबे हे दोघे अकाऊंटंट म्हणून कामाला होते. त्यांच्यावर दुकानातील अकाऊंट पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या दोघांनी दुकानाचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशवर फिर्यादी यांच्या बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्त्यांच्या नावे इनव्हाईस तयार केले. ते धनादेश अनोळखी व्यक्तींच्या खात्यावर जमा करुन पैसे काढून घेत राहिले. त्यानंतर त्यांच्यातील एकाने मागील सप्टेंबर २२ मध्ये नोकरी सोडून दिली.
त्यानंतर दुसर्याने फेब्रुवारीमध्ये नोकरी सोडली. त्यानंतर एका धनादेशाबाबत फिर्यादी यांना शंका आली. त्यावर आपली बनावट सही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मागील दोन वर्षांचा हिशोब तपासल्यानंतर या दोघांनी वेळोवेळी बनावट सह्या करुन तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार ७२५ रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील युनिट-1 चे सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Fraud News | पुण्यात गुंतवणुकीचा मोठा घोटाळा; शेकडो जणांची कोट्यावधींना फसवणूक
Fraud News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत वर्गमित्रानेच केली फसवणूक ; खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime : पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक ; गुन्हा दाखल..!