Pune Crime News | पुणे : पुण्यातून सायबर चोरीची घटना समोर आली आहे. नवीन क्रेडीट कार्डचे पिन जनरेट करण्याचे सांगत एकाची तब्बल ७ लाख ६८ हजार १९५ रुपयांची फसवणूक केली आहे.
बँकेकडून फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड आले असता ते कार्ड अॅक्टीव्हेट करण्यासाठी कार्डाबरोबर आलेल्या पत्रावरील संपर्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने पिन जनरटे करण्याचे सांगत एनी डेस्क अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले व त्यामाध्यमातून फसवणूक केली. विशेष म्हणजे फायनान्स कंपनीच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकवरून ही फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी ५० वर्षीय नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सरोजकुमार जेना आणि धमेंद्र सोनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एनी डेस्क अॅप डाउनलोड…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना आर बी एल बँकेचे क्रेडिट कार्ड बजाज फिनसर्व तर्फे कुरियरने पाकिट मिळाले. दरम्यान कार्ड सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी क्रेडिट कार्ड व बजाज फिनसर्व कंपनीच्या पॉकिटवर असलेल्या फ्री क्रमांकवर संपर्क केला.
फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी त्यांनी आपण बजाज फिनसर्व बँकेच्या वतीने बोलत असल्याचे सांगितले. त्याने आलेल्या क्रेडिट कार्डचा नंबर, त्याच्या मागील सी वी वी नंबर विचारला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला एक ओ टी पी नंबर विचारला. त्याने कार्ड अॅक्टीव्हेट होत नाही असे सांगून पुन्हा दोन वेळा आलेले ओ टी पी त्यांच्याकडून घेतले. त्यावेळी त्यांना दुसरे काम असल्याने त्यांनी तो कॉल कट केला.
दरम्यान दुसर्या दिवशी त्यांना कॉल आला. त्याने बजाज फिनसर्व बँकींग कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. कालचे जे पिन अॅक्टीवेशनचे काम अपूर्ण राहिले आहे. ते काम पूर्ण करुन घेऊ असे सांगितले. त्यांनी तयारी दर्शविल्यावर त्याने फिर्यादी यांना गुगल अॅप स्टोरमधून एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर अॅपमध्ये क्रेडिट कार्ड नंबर, बँक खाते नंबर अशी माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी अशा प्रकारे माहिती नसल्याने व फोन वापरता येत नसल्याने त्यांना त्या अॅपमधून पैसे पाठविण्यास जमले नाही. तेव्हा त्या सायबर चोरट्याने एनी डेस्क अॅपमधून ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी मुलीच्या मोबाईलचा रिचार्ज मारण्यासाठी फोन पे वरुन रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना आपले संपूर्ण बँक खाते रिकामे झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
लोणी काळभोर येथील तरुणाला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल ९० हजार रुपयांना गंडा ;