Pune Crime पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून आणि कौटुंबिक कारणावरून भांडण करत पतीने पत्नीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवले. तसेच त्याचे व्हिडिओ आणि अश्लील फोटो काढले. ते व्हिडिओ नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना पाठवण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार 2014 पासून सुरू होता.
याबाबत एका 34 वर्षीय पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या 39 वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी महिला आणि आरोपी पती पत्नी आहेत. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरात सतत भांडण करून फिर्यादीला आणि तिच्या आईला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. फिर्यादीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवून लैंगिक छळ केला. फिर्यादीची इच्छा नसतानाही तिच्या संमतीविना नेकेड फोटो व खाजगी व्हिडिओ काढून ते तिला दाखवले. तसेच हे फोटो आणि व्हिडिओ फिर्यादीच्या नातेवाईकांना दाखवण्याची धमकीही दिली.
आरोपी पतीने फिर्यादीचा जीमेल आयडी हॅक करून फिर्यादीला माहिती होऊ न देता तिच्या संपर्कातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज मेल केले. फिर्यादीची बदनामी केली. इतकेच नाही तर फिर्यादीचे डिमॅट अकाउंट ओपन करून त्याचा पासवर्ड स्वतःकडे ठेवून फिर्यादीचे परस्पर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा गैरवापर केला असल्याचे फिर्यादी पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.