Pune Crime | पुणे : ‘मला सोडचिठ्ठी दे’ अशी मागणी करून पतीने भर रस्त्यात मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार वडगाव शेरी परिसरातील मुंढवा रस्त्यावर तेजस ढाब्याजवळ घडला.
याप्रकरणी वडगाव शेरीतील मदर तेरेसा शाळेजवळ राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून चंदननगर पोलिसांनी महिलेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या भाजी घेण्यासाठी मुंढवा रस्त्यावरून पायी जात होत्या. त्या वेळी पती तिथे आला. त्याच्यासोबत चौघे जण होते. पतीने पत्नीला शिवीगाळ करून ‘मला सोडचिठ्ठी दे’, असं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, एका आरोपीने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. या मारहाणीत महिला जखमी झाल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. चंदननगर पोलिस याचा तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | महिलेचे फोटो इन्स्टावर व्हायरल करण्याची धमकी देत केली पैशांची मागणी, भोसरीतील प्रकार
Pimpri Crime | कोयता गॅंगची दादागिरी ! आम्ही इथले भाई म्हणत तरुणावर कोयत्याने वार; चिखलीतील घटना