पुणे : इंस्टाग्रामची लिंक पाठवून सायबर चोरट्याने पुण्यात एका तरुणीला तब्बल १ लाख १३ हजारांना गंडा घालण्यात घटना समोवार ( ता.३) उघडकीस आली आहे.
याप्रकरणी नागपूरच्या एका २३ वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार
डायना स्पेन्सर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी पुण्यात तिच्या नातेवाईकांकडे आली. तरुणीला इंस्टाग्राम अकाऊंटवर अॅमेझॉनची एक लिंक समोवारी (ता.३) आली. त्या लिंगमध्ये असे म्हंटले होते की, ई कॉमर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करा आणि पैसे कमवा. तेव्हा तिने त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर तिला मेसेज आला आणि सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रिया समजून सांगितली. इथे लॉगिन करुन तुम्ही जर रिचार्ज केले तर तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. असा मेसेज आला आणि एक पेज ओपन झाला.
दरम्यान, तरुणीने याठिकाणी सर्व माहिती भरुन त्यावर रजिस्ट्रेशन केले. लॉगिन करताच एक अॅमेझॉनचे पेज ओपन झाले. त्यामध्ये तिला सुरुवातीला रिचार्ज करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने सुरुवातीला त्या पेजवरुन २०० रुपायचे रिचार्ज केले. आणि लगेच तिच्या खात्यात ४०० रुपये जमा झाले. म्हणून तिचा विश्वास बसला आणि त्यानंतर तिला एक टास्क देण्यात आला. यात तिला आणखी रिचार्ज करायला सांगण्यात आले. तेव्हा तरुणीने पुन्हा ५०० रुपयांचे रिचार्ज केला. त्यानंतर तिच्या खात्यात ९६० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. अशाप्रकारे तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर तरुणीला पुन्हा १ लाख रुपयांचा रिचार्ज करण्यास सागितले. मात्र तिने रिचार्ज केल्यानंतर तिच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यानंतर तरुणीने विचारणा केली. तुम्हाला टॉपअप मारल्यानंतर तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा करणार म्हणून सांगितले गेले आहे, असे सांगण्यात आले. तिने पुन्हा १ हजार रुपयांचे टॉपअप मारले. तरीही तिच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. अशाप्रकारे तिने तब्बल १ लाख १३ हजार १३७ रुपयांचे रिचार्ज मारले.