Pune Crime पुणे : लग्नाच्या आमिषातून एका १४ वर्षीय मुलीची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातील खडकी भागातून समोर आला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तू खूप आवडते, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे खोटे आमिष दाखवत मुलीसोबत प्रेम संबंध ठेवत लग्नाचे खोटे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने प्रियकराविरुद्ध पोलिसात धाव घेतली.
याप्रकरणी पीडितेच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून जोयल जॉनी फ्रॅंक (वय 21, आकाशदीप अपार्टमेंट लक्ष्मीबाई गार्डन जवळ खडकी पुणे) याच्या विरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
आरोपीने प्रेम असल्याचे व लग्नाच्या खोटे आमिष पीडित मुलीस दाखलवे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुद्धा आरोपीने मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तू खूप आवडते, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे सांगत प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यांनतर मित्राच्या घरी घेऊन जात तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या संपूर्ण प्रकारातून ही मुलगी गर्भवती राहिली. पुढिल तपास पोलीस करत आहेत.