Pune Crime पुणे : खेळताना विहिरीत पडून ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने विहिरीतून मुलाचा मृतदेह काढण्यास अग्निशमन दलाला तब्बल तीन तास लागले. बुधवारी (ता. २६) येवलेवाडीतील अंतुले नगर परिसरात ही घटना घडली.
साई भगवान यादव (वय ६, रा. अंतुले नगर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेची कोंढवा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
साई घराजवळील विहिरीजवळ बुधवारी दुपारी दीड वाजता खेळत होता. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. विहिरीला जाळी होती. मात्र, पाणी उपसण्यासाठी जाळीचा काही भाग उघडा होता. साई खेळता-खेळता या खुल्या जागेतून विहिरीत पडला. तिथे कपडे धुणाऱ्या एका महिलेने हा प्रकार पाहिला. तिने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले.
विहीर काठोकाठ भरल्याने कोणालाही विहिरीत उतरता येत नव्हते. कोंढवा पोलिस ठाण्यातील हवलदार विठ्ठल राऊत यांनी हवेली तहसीलदार यांना घटनेची माहिती दिली. या घटनेबाबत दुपारी पावणे दोन वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी साईचा शोध सुरू केला. मात्र, पाण्याचा दाब तीव्र असल्याने आणि खाली गढूळ पाणी असल्याने शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
दरम्यान, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे विजय शिवतारे यांनी पन्नास फूट खोल पाण्यात जाऊन सायंकाळी पाच वाजता साईला बाहेर काढले. मात्र, खूप वेळ पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे केंद्र प्रमुख समीर शेख यांनी सांगितले.
साईचे आई-वडील मजुरीचे काम करतात. साईच्या पालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अवघा सहा वर्षांचा मुलगा गेल्याने यादव दाम्पत्यावर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : गाडीच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या आवळ्या मुसक्या..