मुंबई : मुंबईत सीबीआयने पीएसएल स्कॅम घोटाळ्यात आज छापे टाकले आहे. या छापेमारीदरम्यान, संचालक देवकी नंदनच्या मुंबईतील अंधेरी शहरातील कार्यालयातून सीबीआयला १ लाख अमेरिकन डॉलर आणि २ कोटी रोख रक्कम मिळाली आहेत.
पीएसएल लिमिटेडने कॅनरा बँककडून ४२८ कोट्यवधींचे कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पीएसएल कंपनीने देशातील ४ सरकारी बँकांकडून ४०० कोटींहून अधिक कर्ज घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पीएसएलविरोधात गुन्हा दाखल केला होता.
तसेच याप्रकणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली. छापेमारीदरम्यान, कंपनीच्या संचालकाच्या ऑफिसात इतके मोठे घबाड मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.