Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या भामट्याला अखेर अटक ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 January 2023, 13:26

पुणे : “तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नवऱ्याला लॉटरी लागली आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे”, अशी बतावणी करून लोणी काळभोरसह पुणे शहर पोलीस दलातील ९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अफताफ उर्फ साजिद अहमद शेख (वय ५२ वर्ष, रा. कमल नयन बजाज हॉस्पिटल फातिमानगर, पुणे) असा या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सराईत असून एकच पद्धत वापरून पुण्यात किमान दहा ठिकाणी दहा वेगवेगळ्या जणांना फसविले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ९ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफताफ उर्फ साजिद शेख हा तूमच्या मुलाला किंवा तुमच्या नवऱ्याला लॉटरी लागली आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना आपल्या गाडीवर बसून एखाद्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचा. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन त्यांची लूट करायचा याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी एका आरोपीला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शेख कडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने लोणी काळभोर, वारजे, निगडी, वाकड, देहू रोड, चंदन नगर, कोंढवा, भारती विद्यपीठ, सिंहगड रोड अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वृद्धांना गंडा घातल्याची पोलिसांना माहिती दिली. आरोपीकडून १५ तोळे सोनं, १ बुलेट जप्त करण्यात आली आहे. आरोपीने पुण्यात ९ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे गुन्हे केल्याच निष्पन्न झाले असून पोलिस या आरोपीने असे अजून कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहेत.

दरम्यान, आरोपीकडून पोलिसांनी ९ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख रुपये किमतीची बुलेट असा जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिंहगड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला कोर्टात हजर केल असता कस्टडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार! तरुणाच्या कपाळाच्या मध्यभागी लागली गोळी; रूममधील भयानक दृश्य पाहून पोलिसही सुन्न!

Sunday, 1 November 2026, 9:24

मॉडिफाईड सायलेन्सर अन् बेधडक ड्रायव्हिंग पडणार महागात; भिगवण पोलिसांची धडक कारवाई!

Sunday, 1 November 2026, 9:14

लेक लाडकी योजनेच्या नियमांत मोठा बदल! अदिती तटकरेंची घोषणा; महिलांसाठी नवा निर्णय काय?

Sunday, 1 November 2026, 9:05

पुण्यात रॅपिडोचा मनमानी कारभार! आरटीओच्या कारवाईनंतरही बाईक टॅक्सी सुरूच; प्रवाशांकडून 145 रुपये वसूल..

Sunday, 1 November 2026, 8:34

पुण्यातील महापालिका शाळांवर आता CCTVचा कडक पहारा! 2 कोटींच्या कामाला मंजुरी; विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढणार

Sunday, 1 November 2026, 8:15

1 नोव्हेंबरपासून खिशाला मोठा झटका! दूध-दही, गॅस, दारू महाग; CNG-सिलेंडरचे दर वाढले, बँक आणि FASTag चे नियमही बदलले!

Sunday, 1 November 2026, 7:52
Next Post

पीएसएल घोटाळा प्रकरण ! मुंबईत सीबीआयचे छापे, कंपनीतील संचालकाच्या कार्यालयातून मिळाले 'इतके' मोठे घबाड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp